Latest

हे चालणार नाही, सगेसोयरेची अंमलबजावणी हवीच; उद्यापर्यंत आंदोलनाची दिशा ठरवणार : जरांगे

निलेश पोतदार

जालना ; पुढारी ऑनलाईन मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आज (दि.२०) राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. यावर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया व्यक्‍त केली. आम्‍हाला सगे-सोयऱ्यांचेच आरक्षण पाहिजे. कुणबी आरक्षण हे आमच हक्‍काच आरक्षण आहे. कुणबीतून मराठ्यांना आरक्षण द्या. आम्‍ही स्‍वतंत्र आरक्षणाची मागणी केली नव्हती, मग तुम्‍ही यासाठीच विशेष अधिवेशन घेतले होते का? असा सवाल जरांगे यांनी उपस्‍थित करत सरकारच्या निर्णयावर आपली नाराजी व्यक्‍त केली.

मुख्य मागणी सोडून वेगळ्याच गोष्‍टीसाठी अधिवेशन बोलावलं. मराठ्यांची सरकारने फसवणूक केली असून, ज्‍यांची कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत त्‍यांच्यासाठी सरकारने सगेसोयऱेंची अंमलबजावणी करावी. मराठ्‍यांची नाराजी ओढवून घेवू नका म्‍हणत मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं. आम्‍ही आता मागे हटणार नाही. उद्यापर्यंत आंदोलनाची दिशा ठरवणार असल्‍याच त्‍यांनी जाहीर केलं. आम्‍ही आज वाट बघणार. तुम्‍ही सगे सोयऱ्यांवर चर्चा करता का ते पाहणार नाहीतर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरवणार असल्‍याच त्‍यांनी जाहीर केले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT