Latest

Manoj Jarange Patil : भुजबळांच्या होम पिचवर होणार जरांगे- पाटलांची बॅटिंग

गणेश सोनवणे

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा, मागील महिन्यात मराठा आरक्षणासाठी प्राणांतिक लढा देणारे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा येवला शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर साेमवारी (दि. 9) सकाळी 9 ला होणार असल्याची माहिती येथील सकल मराठा समाजाने दिली. मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांत भुजबळ यांच्याविषयी आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 20 वर्षांपासून भुजबळांचे प्राबल्य असलेल्या येवल्यातील सभेत ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

संबधित बातम्या :

शरद पवार यांच्या सभेनंतर होणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांच्या सभेला जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्यांतील तरुणाई व मराठा समाज बांधव उत्साही दिसून येत आहे. सभा प्रचंड मोठी व यशस्वी होण्यासाठी समाजाने मोठ्या ताकदीने कामाला लागण्याचे आदेश समाजाने तालुक्यातील मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांना दिले आहेत. तसेच या नियोजन बैठकीमध्ये सभेसाठी महत्त्वाची आयोजक समिती स्थापन केली आहे. सर्वानुमते ही समिती तालुक्यामध्ये सभा यशस्वी होण्यासाठी काम करणार आहे. या समितीमध्ये अध्यक्षांची निवड करून येथील झुंजारराव देशमुख, सचिन आहेर, महेश काळे, पांडुरंग शेळके, छगन आहेर, प्रवीण निकम, बापूसाहेब काळे, दिनेश पागिरे, मनोज रंधे, भास्कर कोंढरे, बाळासाहेब खानदेशी, प्रमोद पाटील, रामनाथ ढोमसे, संतोष गोरे, शिवा सुराशे, निवृत्ती जगताप आदींचा समावेश केला आहे.  (Manoj Jarange Patil)

समितीच्या माध्यमातून सभेचे सर्व आयोजन केले आहे. मंडप, साउंड सिस्टीम बोर्ड, पिण्याच्या पाण्याची व पार्किंग व्यवस्था, फिरते शौचालय, आसन व्यवस्था या सर्वांची व्यवस्था या कमिटीमधील स्वयंसेवक करणार आहेत. तसेच या सभेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे. 

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT