पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारकडून मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आराेप करत यापुढेही मराठा आरक्षण आंदोलन आंतरवली मंडपात सुरुच होईल. मात्र राज्य सरकार येथील मंडप हटविण्याच्या प्रयत्नात आहे. हा मंडप मराठ्यांची अस्मिता आहे. सरकार दडपशाही कदापिही सहन करणार नाही. मराठ्यांनी दडपशाहीविरोधात लाखाेच्या संख्येने राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना ईमेल करावे, अेस आवाहन आज ( दि. २८ फेब्रुवारी) मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
माध्यमांशी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले की, " राज्य सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल. सगेसोयऱ्यांच्या मागणीवर मी ठाम आहे. आमचे साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. शांततेत आंदोलन सुरुच राहील. सरकारकडून आंतरवली सराटीमध्ये सरकारकडून मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंतरवली येथूनच मराठा समाजा एकटवला. तेथूनच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाले. सरकार तोच मंडप हटवत आहे. मात्र मराठा आरक्षण आंदोलन आंतरवली मंडपात सुरुच राहिल. हा मडप मराठ्यांची अस्मिता आहे. सरकार दडपशाही करत असून आम्ही ती कदापिही सहन करणार नाही."
अशांतता पसरवु नका. आंतरवलीमधील आंदोलकांना अटक करु नका, मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. मी मराठा समाजासाठी तुरुंगातही जायला तयार आहे. मरायला तयार पण हटायला तयार नाही. मराठ्यांनी सात-आठ दिवस शांततेत घ्या. असेही आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा