Latest

माझे वडील जनावर नाहीत; मनमोहन सिंग यांची मुलगी आरोग्यमंत्र्यांवर संतापली

backup backup

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास गेलेल्या आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्यावर सिंग यांची मुलगी चांगलीच भडकली आहे. माझ्या वडिलांना भेटण्यासाठी येताना तुम्हाला फोटोग्राफरची गरज काय? ते प्राणीसंग्रहालयातील जनावर नाहीत, अशा शब्दांत मांडविया यांना फटकारले आहे.

डॉ. मांडविया जेव्हा एम्समध्ये डॉ. सिंग यांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत फोटोग्राफर होते. त्यावेळी डॉ. सिंग यांच्या पत्नीने फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत तो फोटो काढत राहिला. त्यामुळे डॉ. सिंग यांच्या पत्नी संतापल्या.

त्यानंतर डॉ. सिंग यांची मुलगी दमन सिंग यांनी थेट डॉ. मांडविया यांना जबाबदार धरत चांगलेच फटकारले आहे. माझे वडील आजारी आहेत. त्यांना विश्रांतीची गरज आहे. आम्ही चिंतेत असताना तुम्हाला फोटो काढशयचे कसे सुचते? असेही सुनावले आहे.

डॉ. मांडविया जेव्हा एम्समध्ये संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासोबत गेले तेव्हा माझी आई तेथे होती. त्यांनी फोटोग्राफरच्या उपस्थितीतला आक्षेप घेतला व त्याला बाहेर जाण्यास सांगितले. माझी आई वारंवार त्या फोटोग्राफरला बाहेर जाण्यास सांगत होती. मात्र, त्याने त्याकडे लक्ष दिले नाही आणि फोटो काढत राहिला.त्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या.

' माझे आई वडील खूप कठीण परिस्थितीतून जात आहेत. माझे वडील वयस्कर आहेत. ते कुठल्या प्राणीसंग्रहालयातील जनावर नाहीत,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

दमन सिंह यांच्या आरोपांनंतर काँग्रेसनेही मांडविया यांच्यावर आरोप केले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या क्षणाला संधीत रुपांतरित करणे हे भाजप नेत्यांनाच जमू शकते. त्यांनी माफी मागितली पाहिजे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, 'भाजपवाल्यांना प्रत्येक गोष्टीत फोटो काढण्याची संधी मिळते. आरोग्य मंत्र्यांनी या शिष्टाचार भेटीत जनसंपर्काची संधी शोधणे शोभणारे नाही. ही बाब म्हणजे माजी पंतप्रधानांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ आणि प्रथा परंपरांचा अपमान आहे.'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग म्हणाले, 'फोटो ऑफ मोदी सरकार चा हॉलमार्क बनला आहे.'

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT