Latest

Manish Sisodia : ‘तर चौथी पास राजाचा राजवाडा हलू लागेल’; सिसोदिया यांनी लिहिली तुरुंगातून कविता

सोनाली जाधव
पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनिष शिसोदिया यांनी तुरुंगातूनच एक कविता लिहिली असून त्याद्वारे त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही कविता सोशल मीडीयाच्या माध्यमातून सार्वजनिक केली आहे. (Manish Sisodia )

Manish Sisodia : 'शिक्षण विरुद्ध जातीयवाद'

'शिक्षण विरुध्द जातीयवाद' असा या कवितेचा विषय आहे. 'देशात जर लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या तर चौथी पास राजाचा राजवाडा हलायला लागेल', असे शिसोदिया यांनी कवितेत म्हटले आहे. कवितेतील ओळी पुढीलप्रमाणे, 'अगर, हर गरीब को मिली किताब. तो, नफरत की आंधी कौन फैलाएगा. सबके हाथों को मिल गया काम. तो सड़कों पर तलवारें कौन लहराएगा. अगर पढ़ गया, हर गरीब का बच्चा. तो चौथी पास राजा का, राजमहल हिल जाएगा'. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सीबीआयने शिसोदिया यांना गेल्या 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तत्पूर्वी सुमारे सहा महिने शिसोदिया यांची चौकशी झाली होती. दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन मद्य धोरण अंमलात आणले होते. मात्र याद्वारे खाजगी मद्य निर्माते आणि विक्रेत्यांना मोठा लाभ पोहोचवून देण्यात आल्याचा आरोप केजरीवाल सरकारवर झाला होता.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT