Latest

Manish Sisodia Bail Application: मनीष सिसोदीया यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील संशियत आरोपी मनीष सिसोदीया यांच्या जामीनावरील सुनावणी आज (दि.१८) पूर्ण झाली. (Manish Sisodia Bail Application) दोन्ही बाजूंचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर  न्यायालयाने जामीन अर्जावरील आदेश राखून ठेवला आहे.  आता २६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता न्‍यायालय निकाल देणार आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची याप्रकरणी ईडी आणि सीबीआय चौकशी सुरू आहे. दरम्यान त्यांनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. या जामीन याचिकेवर (Manish Sisodia Bail Application) आज दिल्लीतील राऊस अव्हेन्यू कोर्टात सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने यासंदर्भातील निकाल राखून ठेवत, बुधवार, २६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता निकाल देणार असल्याचे स्पष्ट केले.

Manish Sisodia Bail Application: सिसोदीयांच्या ED आणि CBI कोठडीत वाढ

मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले  दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia ) यांची सोमवारी ( दि. १७ ) ईडी आणि सीबीआय कोठडी संपली. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या 'ईडी' कोठडीत २९ एप्रिलपर्यंत तर सीबीआय कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदीया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारीला अटक केली होती. न्‍यायालयाने पुन्हा सिसोदीया यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन आठवड्यांची वाढ केली आहे.

मद्य धोरण घोटाळ्यातील सहभागाचे आरोप

मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा 'ईडी' तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे, आदी आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आले आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडीने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT