Latest

मणिपूर पुन्‍हा हादरले, तरुणाला जिंवत जाळल्‍याचा व्‍हिडिओ आला समोर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मणिपूरमध्ये आज (दि.८) कुकी समुदायातील तरुणाला जिवंत जाळल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फ्रंट (ITLF) चे प्रवक्ते गिंजा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, असे वृत्त दैनिक 'भास्‍कर'ने दिले आहे.
हा व्हिडिओ मे महिन्यातील आहे; पण तो आताच समोर आला आहे, असे गिंजा यांनी म्‍हटले आहे. राज्‍याचे पोलीस महासंचालकांनी या घटनेची दखल घेत पोलीस तपास सुरु असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. ( Manipur viral video )

गिंजा यांनी शेअर केलेला व्‍हिडिओ सात सेकंदाचा आहे. यामध्‍ये एक तरुण जिवंत जाळताना दिसत आहे. जवळपास काही आरोपींचे फक्त पाय दिसत आहेत. व्हिडिओच्या पार्श्वभूमीतून गोळीबाराचा आवाजही येत आहे. मणिपूरचे डीजीपी राजीव सिंह यांनी दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, आम्हालाही काही वेळापूर्वी हा व्हिडिओ मिळाला होता. आम्ही त्याची पुष्टी करत आहोत.

शनिवारी रात्री उशिरा इंफाळ पश्चिम येथील सिंगजामेई येथील ग्रामविकास मंत्री वाय खेमचंद यांच्या घराच्या गेटजवळ ग्रेनेडचा स्फोट झाला. या अपघातात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री बिरेन सिंह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT