Latest

Manipur Violence 2023 : मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न

दिनेश चोरगे

इम्फाळ; वृत्तसंस्था :  दोन विद्यार्थ्यांच्या हत्येवरून सुरू असलेला मणिपूरमधील हिंसाचार सुरूच असून निदर्शकांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंग यांच्या वडिलार्जित घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तत्पर सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोरांना घटनास्थळावरून पिटाळून लावले. (Manipur Violence 2023 )

दरम्यान, पोलिस महासंचालकाच्या कार्यालयावरच हल्लाबोल केला असून, अनेक ठिकाणी जाळपोळ केली. मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये 3 मेपासून सुरू असलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा हिंसाचार उसळला आहे. आज भाजप कार्यालयाला आग लावण्यात आली. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ केली आहे. पोलिस महासंचालकांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला. गेल्या 24 तासांत राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हिंसाचाराशी संबंधित घटनांप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Manipur Violence 2023 )

संबंधित बातम्या : 

सीबीआयचे विशेष संचालक अजय भटनागर त्यांच्या पथकासह बुधवारी विद्यार्थी हत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष विमानाने इम्फाळ येथे पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मणिपूरमध्ये जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. राजधानी इम्फाळसह अनेक ठिकाणी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि बनावट बॉम्बचा वापर केला. तसेच पेलेट गनमधून गोळीबार केला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. गेल्या दोन दिवसांत इम्फाळ खोर्‍यात झालेल्या निदर्शनांमध्ये 50 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. मणिपूरमधील डोंगराळ भागात अफ्स्पा हा विशेष लष्करी कायदा आणखी सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. (Manipur Violence 2023 )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT