Latest

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर!! कोकण रेल्वे मार्गावर धावणार मँगो स्पेशल ट्रेन

backup backup

यंदाचा आंबा हंगाम सुरू होण्याआधीच कोकण रेल्वेने आंबा उत्पादक शेकऱ्यांना खुशखबर दिली आहे. येत्या एप्रिल २०२२ पासून कोकण रेल्वेमार्फत मँगो स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गमधील कुडाळ तसेच रत्नगिरी येथून आंबा पार्सल घेऊन ही आंबा विशेष पार्सल नवी मुंबईपर्यंत धावणार आहे.

कोकणात उत्पादित होणारा आम्रराज हापूस वेगवान मार्गाने आणि किफायतशीर पद्धतीने बाजारापेठेत पोहचावा, यासाठी कोकण रेल्वेकडून यावेळी हंगाम सुरु होण्याआधीच काही महिने मँगो स्पेशल ट्रेन चालवण्याचे नियोजन केले जात आहे.

येत्या एप्रिल २०२२ पासून उत्पादकांची मागणी असेपर्यंत ही गाडी चालवली जाणार आहे. यासाठी कोकणातील आंबा उत्पादक यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दि. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी दु. २ वाजता एक बैठक रत्नागिरी एमआयडीसीमधील कोकण रेल्वेच्या क्षेत्रीय कार्यलयात आयोजित करणात आली आहे.

हेही वाचलत का?

SCROLL FOR NEXT