Latest

उल्हासनगर : मानस टॉवर इमारतीचा स्लॅब कोसळला; चार जणांचा मृत्यू

अमृता चौगुले

उल्हासनगर (ठाणे), पुढारी वृत्तसेवा : उल्हासनगर कॅम्प 5 मधील ओटी परिसरातील कपलेश्वर मंदिर परिसरात मानस टॉवर ही पाच मजली इमारत आहे. ह्या इमारतीत 20 सदनिका आणि चार दुकान होती. इमारतीची अवस्था बिकट असल्याने 11 सदनिका रिकामी होत्या. तळ मजल्यावर सुरेश ओचानी यांची पिठाची चक्की आहे. ह्या चक्कीच्या दुकानावरील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज ( दि २२ ) दुपारी 12 वाजताच्या सुमारास कोसळला.

ह्या घटनेची माहिती महापालिका प्रशासनाला मिळताच सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अग्निशामक दलाचे प्रमुख बाळू नेटके हे त्यांच्या पथकासह दाखल झाले. सुमारे चार तास चाललेल्या मदतकार्यानंतर प्रिया धोलनदास धनवानी(वय 24), धोलनदास बासुमल धनवानी (वय 58), रेणू धोलनदास धनवानी (वय 55), सागर सुरेश ओच्छानी (वय 21) यांना ढिगाऱ्याखालून काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला.

जुनी धोकादायक इमारत 

मानस टॉवर ही इमारत 1990 च्या सुमारास उभारण्यात आली होती. इमारतीच्या बाह्य भागात मोठ्या प्रमाणात झाड उगवली होती. काही ठिकाणी इमारतीचे प्लॅस्टर ही कमकुवत झाल्याने मोठ्या प्रमाणात सदानिकाधारक विस्थापित झाली होते. पावसाळ्यापूर्वी तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेंद्र पंजाबी यांनी सदरच्या इमारतीला सरंचनात्मक तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली होती, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

प्रियाचा  डिसेंबर महिन्यात होणार होता विवाह

प्रिया ही मानस टॉवर ह्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आईवडिलांबरोबर राहत होती. एका महिन्यापूर्वी प्रियाचा साखरपुडा झाला होता. तिचा जन्म हा मानस टॉवर मधील सदनिकेत झाला असल्याने तिथूनच माझी पाठवणी व्हावी, अशी तिची इच्छा होती. मात्र त्यापूर्वी काळाने तिच्यावर झडप घातली.

वडील बचावले, मुलाचा मृत्यू 

मानस टॉवरच्या तळ मजल्यावर सुरेश ओचाणी यांची पिठाची गिरणी होती. सुरेश ओचानी हे गौशाळेत जाण्यासाठी दुकानाबाहेर निघाले, त्यांनी सागरला गिरणी संभाळण्यास सांगितली. ते गिरणी बाहेर पडल्याने आणि स्लॅब कोसळला. त्यांच्या डोळ्यासमोर सागर हा मलब्याखाली अडकल्याने सुरेश यानी मदतीसाठी डाहो फोडला. परिसरातील नागरिकांनी मदतीला धावून आले, मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सागरचे प्राण गेले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT