Latest

पत्नीच्या परस्पर बँकेच्या लॉकरमधून 16 लाख 10 हजारांचे दागिने, चांदीची भांडी लांबवली

अमृता चौगुले

पिंपरी : पत्नीच्या परस्पर बँकेच्या लॉकरमधून 16 लाख 10 हजारांचे सोन्याचे दागिने, चांदीची भांडी काढले. याप्रकरणी पतीसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जून 2022 रोजी वाकड येथे घडला. विशाल सुधाकर पाटील (46, रा. वाकड), सुधाकर पंडितराव पाटील (74, रा. गोरेगाव मुंबई) आणि महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती विशाल यांनी फिर्यादी यांच्या परस्पर बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 16 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चांदीची भांडी काढून घेऊन त्याचा अपहार केला. विवाहितेला हाताने मारहाण करून शारीरिक दुखापत केली. तसेच, शिवीगाळ करून विवाहितेला घरातून बाहेर हाकलून दिले. घरात येण्यास मज्जाव केला. आरोपींनी लग्न झाल्यापासून माहेरहून पैसे आणावे म्हणून विवाहितेला वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT