Latest

Man Poses As Cop | काय तो कॉन्फिडन्स! वय २२, वजन १२० किलो : तोतया पोलिस खऱ्या पोलिसांच्या जाळ्यात (व्हिडिओ)

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन – फिरोजाबाद येथील टुंडला परिसरात पोलिसांनी एक तोतया पोलिसाला अटक केली आहे. या तोतया पोलिसाचे वय २२ आणि वजन १२० किलो आहे, आणि त्याने गणवेशावर ३ स्टार लावले होते. वजन आणि वय यामुळेच हा तोतया पोलिस पोलिसांच्या नजरेत आला.  (Man Poses As Cop)

या प्रकरणातील तोतयाच पोलिसाचे नाव मुकेश यादव असे आहे. शनिवारी पोलिसांनी माहिती मिळाली की एक पोलिस अधिकारी जरौलीकला या गावाजवळील महामार्गावर वाहन चालकांकडून हप्ता वसुली करत आहे. या माहितीवरून पोलिस निरीक्षक राजेश पांडे आणि गौरव शर्मा यांनी या ठिकाणी भेट दिली असता पोलिसाच्य वेशात एक तरुण वाहन चालकांडकडे चौकशी करत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, तो उलट पोलिसांनाचा उलट उत्तरे देऊ लागला. पण पोलिसांनी त्याला योग्य भाषेत विचारल्यानंतर मात्र त्याची तोतयागिरी उघड झाली.

मुकेश यादव याने बनावट ओळखपत्रही बनवून घेतले होते. टोल वाचवण्यासाठी मुकेश यादव पोलिसांचा गणवेश परिधान करत होता. त्यातून नंतर त्याने वाहनचालकांकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली.

वजन आणि वयामुळे अडचणीत
मुकेश यादवचे वय फक्त २२ आहे तर वजन १२० किलो आहे. इतक्या कमी वयात इतक्या वजनाने पोलिस आधिकारी होणे ही निव्वळ अशक्य गोष्ट आहे. शिवाय इतक्या कमी वयात तो ३ स्टार मिरवत होता. त्यामुळो पोलिसांच्या त्याच्यावरील संशय बळावला. (Man Poses As Cop)

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT