Latest

मलेशियच्या राष्ट्रीय फुटबॉलपटूवर अॅसिड हल्ला; खेळाडू गंभीर जखमी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : मलेशियन फुटबॉलपटूवर रविवारी (दि.5) जीवघेणा हल्ला झाला. फैसल हलीम नावाच्या या फुटबॉलपटूवर एका शॉपिंग मॉलमध्ये ॲसिड फेकण्यात आले. या हल्यात तो जखमी झाला. सेलंगोरचे राज्य क्रीडा अधिकारी नजवान हलीमी यांनी सांगितले की, मलेशियाच्या राष्ट्रीय संघाचा खेळाडू फैसल याच्यावर क्वालालंपूरच्या पेटलिंग जया जिल्ह्यात हल्ला झाला. यात फैसल जखमी झाला. २६ वर्षीय फैसल सेलंगोर फुटबॉल क्लबमध्ये विंगर आहे.

या घटनेत नेमक काय घडलंं?

  • मलेशियाचा राष्ट्रीय फुटबॉलपटू फैसलवर अॅसिडचा फेकले
  • हा हल्ला पेटलिंग जया जिल्ह्यात झाला.
  • सेलंगोरचे राज्य क्रीडा अधिकारी नजवान हलीमी यांनी घटनेची अधिकृत माहिती दिली.
  • यानंतर फैसलने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत संशयितांना अटक करण्याची मागणी केली.
  • तीन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात सहकारी खेळाडू जखमी
  • फैसली आधी राष्ट्रीय खेळाडू अख्यर रशीदवर हल्ला झाला होता.

जखमी फैजलचा फोटो व्हायरल

हल्याबाबत नजवान म्हणाला, 'मी या हिंसाचाराचा तीव्र निषेध करतो आणि पोलिसांना लवकरात लवकर दोषीला अटक करण्याची विनंती करतो.' सेलंगोरचे पोलीस प्रमुख हुसेन उमर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मात्र, या मागचा हेतू त्यांनी अद्याप स्पष्ट झालेला नाही.

तीन दिवसांपूर्वी हल्ल्यात सहकारी खेळाडू जखमी

तेरेंगानू राज्यात राष्ट्रीय खेळाडू अख्यर रशीदवर हल्ला झाला. स्थानिक माध्यमांनुसार, दोन अज्ञात संशयितांनी 25 वर्षीय अख्यारवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात त्याच्या डोक्याला आणि पायाला मार बसला. अख्यारचे पैसे घेऊन संशयित पळून गेल्याचे स्थानिक

काय म्हणाले मलेशिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष?

मलेशिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष हमीदीन मोहम्मद अमीन म्हणाले की, दोन राष्ट्रीय संघातील खेळाडूंवर झालेल्या हल्ल्यामुळे आपण निराश आणि दु:खी आहोत.

"मलेशियन लोक प्रार्थना करतात की, अख्यर आणि फैसल लवकरात लवकर बरे होऊन खेळाच्या मैदानात परतावे,"

– हमीदीन मोहम्मद अमीन

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT