Latest

Jaswand Ice Tea : साधा चहा तर नेहमी पिता कधी तर जास्वंदीचा चहा प्या

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दररोज सकाळी कडक आणि गरमागरम चहाने आपली सुरूवात होते. कडक चहा पिणे आणि वृत्तपत्र वाचणे हे रोजचेच काम असते. मात्र, त्याचबरोबर प्रत्येकाला उठल्याबरोबर चहा लागतोच. काही जणांना टपरीवरचा चहा तर काहींना मसाले चहा आवडतो. आपण वेलची चहा, तुळस चहा, ग्रीन टी, लिंबू टी, ब्लॅक टी ची चव चाखला असाल. पण, कधी जास्वंदीचा चहा प्यायला आहे का? मग घरच्याघरी जास्वंदीचा चहा कसा बनवायचा हे जाणून घ्या… ( Jaswand Ice Tea )

साहित्य

जास्वंदाची फुले – ३
साखर – ३ कप किंवा मध- १ चमचा
पाणी – ३ कप
लिंबूचा रस- अर्धा चमचा
चहा पावडर- अर्धा चमचा
बारीक चिरलेली पुदिन्याची पाने – २ चमचा
बर्फाचे तुकडे

कृती

१. पहिल्यांदा २-३ जास्वंदीच्या फुले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. यानंतर त्याच्या खालचा हिरवा देठ आणि फुलांच्या मधोमध असणारे केशर काढून टाकावे.

२. जास्वंदीच्या पाकळ्या एका प्लेटमध्ये ठेवावे.

३. गॅसवर भांडे ठेवून त्यात ३ कप पाणी घालून उकळावे.

४. उकललेल्या पाण्यात लिंबूचा रस आणि जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या घालाव्यात.

५. यानंतर त्यात चहा पावडर आणि साखर किंवा मध घालून हे मिश्रण हलवून चांगले उकळावे.

६. जास्वंदीच्या फुलाचा रंग बदलेपर्यंत हे उकळत ठेवावे आणि नंतर गॅस बंद करावा.

७. यानंतर उकळलेला चहा एका गाळणीने गाळून घ्यावा.

८. हा चहा गार होण्यास फ्रिजमध्ये किंवा बाजूला ठेवून द्यावा.

९. यानंतर एक ग्लास घेवून त्यात २-३ बर्फाचे तुकडे घालावे.

१०. बर्फावर गोल कापून २ लिंबूचे काप आणि पुदिनाची पाने घालावीत. यानंतर हा चहा त्यात ओतावा.

११. यानंतर ग्लासवर शोभेसाठी गोल लिंबूचा काप अलगद वरती उभा ठेवावा. मग तयार झाला तुमचा मस्त जास्वंदीचा चहा. ( Jaswand Ice Tea )

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT