पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल माजी खासदार महुआ मोइत्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला. भाजप खासदार आणि ॲड. जय अनंत देहादराई यांना निर्देश घालण्याची मागणी करणारी महुआ मोईत्रा यांची याचिका न्यायालयाने आज (दि.4 मार्च) फेटाळली. (Mahua Moitra News)
महुआ मोईत्रा यांनी याचिकेत म्हटले होते की, "संसदेत प्रश्न विचारण्यासाठी व्यापारी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचे सांगणारा कोणताही मजकूर तयार करणे, पोस्ट करणे, प्रकाशित करणे, अपलोड करणे, वितरण करणे यापासून भाजप नेते दुबे आणि महुआ मोईत्रा यांचा माजी पती ॲड. जय अनंत देहादराई यांना रोखावे, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली हाेती. ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (Mahua Moitra News)
दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्यानंतर महुआ मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून अदानी समूह प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा दावा भाजप नेते निशिकांत दुबे यांनी केला होता. यानंतर हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे हे मान्य केले. तर मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळून लावत माझा आवाज दडपण्यासाठी हे केले जात असल्याचा दावा केला हाेता. (Mahua Moitra News)
सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि महुआ मोईत्रा यांचे माजी पती जय अनंत देहादराई यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, 'माझ्या आणि निशिकांत दुबे यांच्याविरोधात दाखल केलेला अंतरिम अर्ज फेटाळण्यात आल्याबद्दल मी न्यायालयाचा खूप आभारी आहे. हा काही लोकांचा (महुआ मोईत्रा यांना उद्देशून) दुर्भावनापूर्ण प्रयत्न होता, ज्यांना आम्हाला सत्य बोलण्यापासून रोखायचे होते. त्यांच्या भ्रष्ट कारवाया आम्ही सांगत आहोत. या लढ्यात मी खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले. या सर्वामागील खरा अभिनेता (अपील दाखल केलेल्या व्यक्तीशिवाय) ओडिशातील एक व्यक्ती आहे. पण, आज आमच्या बाजूने निर्णय आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे यापेक्षा अधिक काही बोलणे योग्य ठरणार नाही.
हेही वाचा: