Latest

Mahua Moitra : खासदार महुआ मोईत्रांवर आरोपांची मालिका सुरुच; भाजपकडून चौकशीची मागणी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आरोपांची मालिकाच सुरु केली आहे. महुआ मोईत्रा संसदेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेतात. तृणमुलच्या खासदार मोईत्रा यांनी लोकसभेच्या वेबसाइटच्या अॅक्सेस एका उद्योगपतींला दिला आहे, असे आरोप निशिकांत दुबे यांनी केले आहेत. शिवाय, खासदार मोईत्रा यांची चौकशी व्हावी, अशी मागणीही निशिकांत दुबे यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. (Mahua Moitra)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी रविवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले. या पत्रात दुबे म्हणतात, "सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या वकिलाचे पत्र मला मिळाले आहे. महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यात कथित लाच देवाणघेवाण प्रकरणाचा पुरावाही दिला आहे. हे प्रकरण २००५ मधील 'Cash for Query' या घोटाळ्याची आठवण करुन देणारे आहे." दरम्यान, भाजप खासदाराने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची विनंतीही केली आहे. (Mahua Moitra)

निशिकांत दुबे यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विण वैष्णव यांनाही याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रात दुबे म्हणतात, "महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी आणि हिरानंदानी ग्रुपला लोकसभेच्या वेबसाइटसाठी स्वत:चे लॉगिन दिले होते. याची चौकशी व्हावी." महुआ मोईत्रा यांचे हे वर्तन अनैतिक, बेकायदेशीर आणि देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे सांगून दुबे यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला त्यांच्यावरिल आरोपांना गांभीर्याने हाताळण्याचे आवाहन केले आहे. (Mahua Moitra)

तृणमुल काँग्रेसकडून भाजप खासदारावर हल्लाबोल (Mahua Moitra)

तृणमूल काँग्रेसने भाजप खासदार दुबे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व खासदारांचे लॉगिन तपशील जाहिर करण्याची विनंती केली आहे. "मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDR सह सर्व खासदारांचे स्थान आणि लॉगिन तपशील जाहीर करावा. कृपया कर्मचाऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती जाहीर करावी", अशी मागणीही तृणमुल काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT