Latest

Mahindra XUV400 : प्रतीक्षा संपली; महिंद्राच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टीझर रिलीज, लवकरच येणार बाजारात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : ऑटोमोबाईलमधील महिंद्रा ही महत्वाची भारतीय कंपनी आहे. याच कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार (Mahindra XUV400) बाजारपेठेत येत आहे. महेंद्राची एसक्यूव्ही ४०० ही इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च होणार आहे. महेंद्रा कंपनीने त्याच्या सोशल मीडियावर या नवीन कारचा टीझर रिलीज केला आहे. याबरोबरच कंपनीने XUV400 ही नवीन इलेक्ट्रिक कार ८ सप्टेंबरला जागतिक बाजारपेठेत दाखल होणार असल्याचेही सांगितले आहे.

Mahindra XUV400

महेंद्राच्या या ई-कारची देशातील ग्राहकांना आतुरता होती. काही दिवसांतच ही ई-कार (Mahindra XUV400) बाजारपेठेत येत असल्याने आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून, लवकरच त्यांना ही नवीन ई-कार बाजारपेठेच पाहायला मिळणार आहे. यापूर्वी कंपनीने १५ ऑगस्टला ७६ व्या स्वातंत्र्यदिनी XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 या नवीन पाच इलेक्ट्रिक कारची घोषणा केली होती.

Mahindra XUV400 ची वैशिष्ट्ये

नुकत्याच रिलीज झालेल्या या नवीन इलेक्ट्रिक कारच्या (Mahindra XUV400) ट्रिझरमध्ये कास्य ट्विन पीक्स लोगोसह EV चे क्लोजअप फ्रंट ग्रिलचे डिझाइनही समोर आले आहे. या नव्या कारचा लूक हा थोडा हटके असणार आहे. Mahindra XUV400 महिंद्राच्या AdrenoX कनेक्टिव्हिटीद्वारे समर्पित आहे. ही नवीन ई कार टचस्क्रीन इन्फोटनमेंट सिस्टम, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) आणि दोन बॅटरी पॅक यांसारख्या वैशिष्ट्यांनी अंतर्भूत आहे. ३५०V आणि ३८०V चे पॉवरट्रेन उपलब्ध असतील. नवीन हेडलाइट्स, क्लोज्ड फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्स याचाही समोवेशही यामध्ये असणार आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT