पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्राने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV XUV300 चे नवीन व्हर्जन बाजारात लॉन्च केले आहे. ज्याला XUV300 Turbo Sport असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने या SUV मधील सर्वात मोठा बदल हा त्याचे इंजिन आहे. तसेच या कारच्या स्पीडवर विशेष लक्ष देत अपडेट करण्यात आले आहे. (Mahindra XUV300 Turbo Sport)
कंपनीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या एक्सयुव्ही 300 टर्बो स्पोर्टची सुरूवातीची किंमत 10.35 लाख रूपये इतकी आहे. महिंद्राने टर्बोस्पोर्ट सीरीज एसयुव्ही 300 चे तीन व्हेरिअंट लॉन्च केले आहेत. पहिला W6, दुसरा W8 आणि तीसरा W8(O) असे हे नवे व्हेरिअंट असणार आहे. यामुळे आता कंपनीचे या टर्बो स्पोर्ट प्रकारतील एकूण 5 व्हेरिअंट मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहेत.
महिंद्रा एक्सयुव्ही 300 टर्बो स्पोर्टचे इंजिन 1197 सीसी आणि 1.2 लीटर mStallion TGDI ने सुसज्ज आहे. हे 5000 rpm, 128 bhp power आणि 1500-3750 rpm, 230 nm चे peak torque अशी या इंजिनची खासियत आहे. या सोबतच या 6 speed manual gearbox हा बदल देखील या एसयुव्हीमध्ये (SUV) दिलेली आहे. या नव्या सुधारित बदलांमुळे कंपनी असा दावा करत आहे की, टर्बो स्पोर्टचे नवे व्हेरिअंट ज्यादा स्पीडची हमी देईल.
या एसयुव्हीमध्ये anti-pinch electric sunroof, android auto आणि apple car play कनेक्टीव्हीटीची 7 inch touchscreen infotainment system, cruze cotroll, dual zone automatic air con system, Auto AC, connected car teck, premium letherate upholstry, rain sesing wiper, push button start, passive keyless entry यासारख्या नव्या फिचर्सनी ही कार सुसज्ज असेल. तसेच याचे इंटिरिअरची देखील खासियत अशी आहे की, Dark Red Colour थीमसह Chrome Finnishing असणारे padle आणि All Black Interior ने सुसज्ज असणार आहे.
Maruti Suzuki Brezza, Tata Nexon, Hyundai Venue, Toyota Urban Cruiser, Nissan Magnite, Renault Kiger आणि Kia Sonet या एसयुव्ही महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 टर्बो स्पोर्टला टक्कर देणार आहेत.
हेही वाचा