Latest

Corona Update : महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे २७०१ नवे रुग्ण; एकट्या मुंबईत १२४२ केसेस

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोरोनाने (Corona Update) पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहण्यास मिळत आहे. ताज्या आकेवाडीनुसार बुधवारी (दि. ८) महाराष्ट्रात नव्या २७०१ केसेसची नोंद झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ८१ टक्क्यांनी रुग्णांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. एकट्या मुंबईत १२४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच महाराष्ट्रात बी.ए.५ व्हेरिएंटचा एक रुग्ण मंगळवारी आढळून आला होता.

महाराष्ट्रात कोराना (Corona Update) रुग्णसंख्येत वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी आढावा बैठकी घेतली होती. यावेळी त्यांनी पुन्हा मास्क वापरण्यावर भर दिला होता. तसेच सर्व नियमांचे पालन करा अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली होती. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा लसीकरणावर भर देत नागरिकांनी कोविड लस घेण्याचे आवाहन केले होते.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रासह देशात कोरोना (Corona Update) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बुधवारी देशामध्ये मागील २४ तासात नवे ५२३३ केसेसे समोर आले आहेत. यासह देशात एकूण २८८५७ ॲक्टीव्ह केसेस आहेत. आता ९३ दिवसांनतर भारतात दररोज ५००० कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यासह आतापर्यंत एकूण कोरोना प्रकरणांची संख्या ४,३१,९०,२८२ इतकी झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT