Latest

महाराष्ट्राला ऊर्जा क्षेत्रातील ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’

अमृता चौगुले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला 'स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी' प्रदान करण्यात आला आहे. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच ग्रुपच्यावतीने इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या 'सिल्वर ओक' सभागृहात आयोजित कार्यक्रमात शासन, अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग 'इंडिया गव्हर्नन्स फोरम' च्या 'स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट' २०२१ मध्ये देशात प्रथम स्थानावर राहिला. या उपलब्धीसाठी राज्याच्या ऊर्जा विभागालाही यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या ऊर्जा विभागाने 'एचव्हीडीसी योजने'अंतर्गत एकूण १ लाख २९ हजार ५४६ कृषीपंप ऊर्जान्वित झाले. 'मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजने'अंतर्गत एकूण ९९ हजार ७४४ कृषीपंप बसविण्यात आले.

…यामुळे मिळाला महाराष्ट्राला पुरस्कार

२४ एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने'अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे १२ हजार १०२ घरगुती वीजजोडणी देण्यात आली. कोरोना काळात राज्यातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते,निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या सर्व बाबींच्याआधारे महाराष्ट्राने 'स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट' २०२१ मध्ये देशात प्रथम स्थान मिळविले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT