Latest

Maharashtra Weather Forecast : परतीचा पाऊस ‘जोरधार’; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राज्यात सर्वत्रच परतीचा पाऊस जोरदार सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह इतर भागातही पावसाने हजेरी लावली आहे. उपग्रहाने घेतलेल्या नवीन छायाचित्राच्या निरीक्षणावरून भारताच्या द्वीपकल्पातून ढगांची हालचाल अधिक तीव्रतेने होताना दिसत आहे. त्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Weather Forecast) यलो अलर्ट दिला आहे.

नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवारे वाहत असून, हवेतील आर्द्रता वाढल्याने पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह (Maharashtra Rain Update) २० राज्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला होता. राज्यात सध्या सोयाबिन पिक काढणी सुरू असल्याने, शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 या जिल्ह्यांना यलो अलर्ट

नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांना वगळून हवामान विभागाने राज्यात (Maharashtra Weather Forecast) यलो अलर्ट दिला आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT