Latest

Maharashtra Congress : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसची समिती जाहीर

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसची ५२ जणांची जम्बो प्रदेश निवडणूक समिती आज जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या समितीचे अध्यक्ष असतील. तर विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे केंद्रीय कॉंग्रेसमधील महाराष्ट्रातले पदाधिकारी मुकूल वासनिक, अविनाश पांडे, रजनी पाटील आदी नेत्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. Maharashtra Congress

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या समितीच्या नेमणुकीला संमती दिल्यानंतर पक्षाचे संघटना सरचिटणीस वेणुगोपाल यांनी प्रदेश निवडणूक समितीची घोषणा केली. समितीचे सदस्य खालील प्रमाणे- नाना पटोले – अध्यक्ष, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, शिवराज पाटील, चंद्रकांत हांडोरे, रजनी पाटील, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, मुंबई प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, मोहम्मद आरिफ नसीम खान, बसवराज पाटील मुरुमकर, कुणाल रोहिदास पाटील, सतेज बंटी पाटील, विलास मुत्तेमवार, डॉ नितीन राऊत, संजय निरुपम, सुनील केदार, ॲड. के.सी. पडवी, डॉ. विश्वजीत कदम, अमित देशमुख, भाई जगताप, मोहन जोशी, अस्लम शेख, सुरेश शेट्टी, शिवाजी राव मोघे, हुसेन दलवाई, अनीस अहमद, संजय दत्त, पृथ्वीराज साठे, रामकिशन ओझा, हर्षवर्धन सपकाळ, महेश के. मलिक, वसंत पुरके, नाना गावंडे, प्रमोद मोरे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, अभिजीत वंजारी, अमरजितसिंह मनहास, वजाहत मिर्झा, मुझफ्फर हुसेन, अमर राजूरकर, शरद अहिरे, अनंत गाडगीळ, सिद्धार्थ हाट्टीआंबिरे, भानुदास माळी, अभिजित सपकाळ Maharashtra Congress

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT