Latest

Maharashtra Politics | उद्धव ठाकरे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत का गेले? दीपक केसरकर यांनी केला खुलासा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: उद्धव ठाकरे यांची पुन्हा भाजपसोबत युती करण्याची इच्छा होती, पण यासाठी त्यांची एकच अट होती की, त्यांना पुढील ५ वर्षे मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांची 'मुख्यमंत्री' होण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन लाचारी पत्करली, असा खुलासा शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Maharashtra Politics) यांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

पुढे केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असतानाही आम्ही त्यांच्यासोबत जाण्यासाठी तयार होतो. पण आमची देखील एक इच्छा होती की, त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडावी. परंतु त्यांनी साथ सोडली नाही. पण त्यांनी असे न करता काँग्रेस राष्ट्रवादीची लाचारी पत्करली. ही महाराष्ट्राची परंपरा नाही, तर 'स्वाभिमान' ही महाराष्ट्राची परंपरा (Maharashtra Politics) आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राची 'स्वाभिमानाची' परंपरा आणि संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत (Maharashtra Politics) आहे, असेही शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगतले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT