Latest

Maharashtra Cabinet Expansion | अखेर खातेवाटप ठरलं! अजित पवारांकडे अर्थ आणि नियोजन, पाहा कोणाकडे कोणते खाते?

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत घडामोडींना वेग आला आहे. खातेवाटपाची यादी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी राजभवनात दाखल झाले आहेत. राज्यपाल रमेश बैस यांना खातेवाटपाची यादी सादर केली जाणार आहे. त्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होईल. (Maharashtra Cabinet Expansion)

दरम्यान, खातेवाटपावर आज अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना यादी राज्यपालांकडे गेल्याचे सांगितले. 'मला जी माहिती मिळाली त्यानुसार, राज्यपालांकडे याबाबतची यादी गेली आहे. त्यात वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती खाती दिली आहेत हे जाहीर होईल. त्यानुसार मंत्री जबाबदारी घेतील आणि कामाला सुरुवात करतील,' असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्थ आणि नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. सहकार खाते दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तर धनंजय मुंडे यांना कृषी खाते मिळण्याची शक्यता आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग छगन भुजबळांकडे तर वैद्यकीय शिक्षण खाते हसन मुश्रीफांना मिळण्याची शक्यता आहे. धर्मराव अत्राम यांना अन्न आणि औषध प्रशासन, क्रीडा खाते अनिल भाईदास पाटील यांना तर महिला आणि बालकल्याण खाते अदिती तटकरे यांच्याकडे जाणार असल्याची माहिती आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT