Latest

सख्खे भाऊ ! प्रमाणपत्र मात्र एक कुणबी तर एक मराठा

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  हुतात्मा बाबू गेनू यांचे गाव असलेल्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथे सख्ख्या भावांमधील एकाला कुणबी, तर एक हिंदू मराठा असल्याचे  आहे. त्या दोघा भावांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून हे सत्य समोर आले आहे. त्यामुळे शिंदे समितीने कुणबी संदर्भात सादर केलेला अहवाल खरोखर बरोबर आहे का? याबाबत मात्र उलटसुलट चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले आहे.

संबंधित बातम्या :

आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ गावात या एका गावातच 1 हजार 120 नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी कुणबी संदर्भात नोंदी तपासले असता 13 हजार 499 नोंदी कुणबी आढळून आले आहे, असे शिंदे समितीच्या अहवालामध्ये म्हटले आहे. मात्र, ही आकडेवारी केवळ मराठवाड्यातील असल्याची समोर आली आहे.

जना कृष्णाजी आंबटकर (कुणबी), सुदाम कृष्णाजी आंबटकर (हिंदू मराठा, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि.पुणे) अशी नोंद दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यावर आहे. दरम्यान, हे प्रमाणपत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्यातही हाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी, तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून आहेत. सरकारला फक्त धोरणात्मक निर्णय मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. एवढ्यासाठी किती आढेवेढे घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

SCROLL FOR NEXT