Latest

Mahabaleshwar : धुक्यात हरवलं महाबळेश्वर, पर्यटकांची रेलचेल

स्वालिया न. शिकलगार

महाबळेश्वर: प्रेषित गांधी : महाबळेश्वर शहर व परिसरात बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वर (Mahabaleshwar) पर्यटनस्थळाचे रुपडे पालटले आहे. धुक्यात हरवलेल्या महाबळेश्वरच्या धुंद वातावरणाने पर्यटक बेधुंद होत आहेत. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णालेक व परिसरात धुक्यात हरवला असून पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवयास मिळत आहे. लहानांपासून आबालवृध्दांपर्यंत या बदलणाऱ्या वातावरणाचा आनंद घेताना पाहावयास मिळत आहे. कुणी सेल्फी घेतना तर कुणी कोसळणाऱ्या या पावसात मनमुराद भिजताना तर कुणी वेण्णालेकवरील थंड वातावरणात आलेदार चहा अन् गरमागरम कणसावर ताव मारताना दिसत आहे. (mahabaleshwar)

मुख्य बाजारपेठेतदेखील खरेदीसाठी पर्यटक येत असून थंड वातावरणात शाल मफलर जॅकेट ब्लँकेट्स खरेदी करताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. पर्यटकांची या पर्यटनगरीमध्ये वर्षा पर्यटनासाठी रेलचेल असून सर्वात सुरक्षित असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांची पावले वळत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT