Latest

Madhya Pradesh: इंदूरमध्ये रामनवमी दिवशी मोठी दुर्घटना, विहिरीचे छत कोसळून २५ हून अधिकजण पडले पाण्‍यात

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आज (दि.३०) रामनवमी दिवशी मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने २५ हून अधिक लोक पाण्‍यात पडले. विहिरीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिक विहिरीच्या पायऱ्यांवर पडलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बेलेश्वर महादेव मंदिरात घडलेल्या दुर्घटनेची दखल घेतली आहे. त्‍यांनी  इंदूरचे जिल्हाधिकारी आणि इंदूरच्या आयुक्तांना बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. सीएमओ इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. इंदूर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इंदूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी बचावकार्य ,राबवत आहेत. भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 10 जणांना विहिरीच्या पायऱ्यांवरून वाचवण्यात यश आले आहे. तर 9 जणांना सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित लोकांच्या सुटकेसाठी वेगाने प्रयत्न सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT