Latest

मध्यप्रदेशमध्ये पुजाऱ्यास बेदम मारहाण; पूजेनंतर इच्छापुर्ती न झाल्याने बदडले

अमृता चौगुले

इंदौर; पुढारी ऑनलाईन : मध्यप्रदेशमध्ये एका पुजाऱ्यास पूजेस बोलवणाऱ्या बाप व त्याच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केल्याची घटना इंदौर येथे घडली आहे. सत्य नारायणारची पूजा घातल्यानंतर अपेक्षीत इच्छा पुर्ती व पूजा यशस्वी न झाल्याने बाप आणि मुलांनी मिळून पुजाऱ्यास धोपटले. या मारहाणीत पुजारी जखमी झाला असून मारहाण करणाऱ्या बाप आणि त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुळचा राजस्थान मधील कोटा येथील रहवासी असणारे कुंजबिहारी शर्मा या पुजाऱ्यास मारहाण करण्यात आली. त्या पुजाऱ्यास पूजा घालण्यास घरात बोलवणाऱ्या लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांच्या दोन मुलांनी विपूल आणि अरुण यांनी बेदम मारहाण केल्याची माहिती चंदन नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी अभय नेमा यांनी वृत्तसंस्थेला दिली.

रक्ताने माखलेल्या अवस्थेत येथील घर योजना ७१ मधील नागरिकांनी पुजाऱ्याला पोलिस ठाण्यात घेऊन आले. ६० वर्षांच्या कुंज बिहारी यांनी सांगितले की, त्यांना पूजा विधी करण्यासाठी लक्ष्मीकांत शर्मा यांनी घरी बोलवले होते. त्यांच्याकडील पूजाविधी संपल्यावर मी घरी गेलो असे पुजाऱ्याने पोलिसांना सांगितले.

यानंतर रात्री उशिरा लक्ष्मीकांत शर्मा आणि त्यांची मुले विपुल आणि अरुण हे येऊन पुजाऱ्यास मारहाण केली. तसेच विपुल शर्मा याने पुजाऱ्याचा कानाचा चावा घेतला यामुळे त्यांचे कान फाटले. तसेच पुजाविधी संपल्यावर लक्ष्मीकांत शर्मा यांचा मुलगा अरुण हा पुजाऱ्याशी विचित्रपद्धतीने वागत होता, असे पुजाऱ्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या नंतर पुजाऱ्याच्या शेजाऱ्यांनी पुजाऱ्याला शर्मा आणि त्यांच्या मुलांच्या तावडीतून वाचवले व रुग्णालयात पोहचवले. पोलिसांनी लक्ष्मीकांत शर्मा यांच्यासह त्यांची मुले विपुल आणि अरुण यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली.

लक्ष्मीकांत शर्मा यांचा मुलगा अरुण याचे लग्न जुळत नव्हते त्याचे लग्न जुळावे या करीता त्यांच्या घरात सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली होती. या पूजेचे सर्व विधी पुजारी कुंज बिहारी यांनी पार पाडले होते.


अधीक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT