Latest

Langya henipavirus : चीनमध्ये आढळला लांग्या विषाणू, ३५ जणांना लागण; रूग्णांमध्ये यकृत, किडनीची समस्या

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने गेली दोन वर्षे जगभर थैमान घातले होते. यानंतर आता लांग्या हेनिपाव्हायरस हा नवीन विषाणू चीनमध्ये आढळून आला आहे. या नवीन विषाणूमुळे जगाचे टेन्शन वाढले आहे. चीनच्या पूर्व भागात आत्तापर्यंत या विषाणूचे ३५ रूग्ण आढळले आहेत. या विषाणूमुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

चीनमधील पूर्वेकडील शेंडोग आणि हेनान या शहरात लांग्या हेनिपाव्हायरस या नवीन विषाणूने बाधित रूग्ण आढळले आहेत. यामध्ये सध्यातरी कोणाचाही मृत्यू झालेला नाही, पण याचे स्वरूप गंभीर झाल्यास यामध्ये रूग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो, असे वृत्त एका जागतिक वृत्तवाहिनीने दिले आहे.

लांग्या हेनिपाव्हायरस हा विषाणू हा प्राण्यापासून आला असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या विषाणूची लागण झालेल्या 54 टक्के रुग्णांमध्ये थकवा, 50 टक्के मध्ये खोकला, 50 टक्के भूक न लागणे, 46 टक्के शरीर आणि स्नायू दुखणे आणि 38 टक्के रुग्णांनी अस्वस्थतेची तक्रार नोंदवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त किमान 35 टक्के रुग्णांना यकृत आणि 8 टक्के रुग्णांना किडनीचा त्रास जाणवला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT