Russia Ukrain War : रशियन हवाई तळाला मोठ्या स्फोटांच्या मालिकेने हादरवले, एक ठार

Russia Ukrain War : रशियन हवाई तळाला मोठ्या स्फोटांच्या मालिकेने हादरवले, एक ठार

पुढारी ऑनलाइन डेस्क : रशियाच्या जोडलेल्या क्रिमियन द्वीपकल्पातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट्सजवळील रशियन हवाई तळाला मोठ्याने स्फोटांच्या मालिकेने हादरवले, ज्यात एक व्यक्ती ठार झाली. मॉस्कोने दावा केला की ते संग्रहित दारूगोळ्याचे स्फोट होते आणि, कीवने जबाबदारी नाकारली, असे रॉयटर्सने ट्वीट केले आहे.

स्थानिकांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, क्रिमियन द्वीपकल्पातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट्सजवळ तब्बल 12 स्फोट झाल्याचे त्यांनी ऐकले. स्थानिक वेळेनुसार मंगळवारी दुपारी 3.20 च्या सुमारास हे स्फोट घडले. त्यांच्या म्हणण्यानुसार अर्ध्यातासानंतर झालेला स्फोट सर्वात जास्त मोठा होता. घटनेत 5 जण जखमी झाले आहे तर एक जण ठार झाला आहे.

या स्फोटाबाबत मॉस्कोने दावा केला आहे की ते संग्रहित दारुगोळ्याचे ब्लास्ट होते. तर कीव ने देखील या ब्लास्टची जबाबदारी नाकारली आहे. या स्फोटनंतर सुरुवातीला सोशल मीडियावर युक्रेनच्या मिसाईलने रशियाच्या हवाई तळावर ब्लास्ट केले असे चित्र रंगवले गेले. तसेच या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची प्रदेश प्रमुखाने घोषणा केल्यानंतर याला एक महत्वपूर्ण स्ट्राईक म्हणून पाहिले जात होते. तसेच नंतर एक वरिष्ठ युक्रेनियन अधिकारी तपशील न देता जबाबदारीचा दावा करताना दिसला.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने RIA नोवोस्टी या वृत्तसंस्थेला सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.20 च्या सुमारास हा स्फोट झाला आणि अनेक एव्हिएशन म्युनेशन स्टोरेज एरियामध्ये नष्ट झाले. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच कीवनेही या स्फोटाची जबाबदारी नाकारली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news