Latest

London News : लंडनमध्‍ये चर्चजवळ गोळीबार, मुलीसह पाचजण जखमी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमधील (London News) युस्टन स्टेशनजवळील चर्चच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली. यामध्‍ये सात वर्षांच्‍या मुलीसह पाच जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेली मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे.

पोलिसांच्या माहीतीनूसार,  १४ जानेवारी दुपारी दीडच्‍या सुमारास युस्टन स्टेशनजवळील सेंट अलॉयसियस रोमन कॅथोलिक चर्चमध्ये नोव्हेंबरमध्ये आई आणि मुलीच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात लोक सहभागी झाले होते. यावेळी अचानक धावत्‍या वाहनातून गोळीबार सुरु झाला. अंदाधूंद गोळीबार करत हल्‍लेखोरांनी पलायन केले. पाच जण जखमी झाले. यामध्‍ये ७ वर्षीय आणि १२ वर्षीय मुलींचा समावेश आहे.

गोळीबारात जखमी झालेली सात वर्षीय मुलगी गंभी असून ती मृत्‍यूशी झुंज देत असल्‍याचे स्‍थानिक पोलिसांनी सांगितले. तर १२ वर्षीय मुलीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. उपचारानंतर तिला सोडण्यात आले आहे. चौघा जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT