Latest

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं कौतुक केलं आहे. पुण्यात आज नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंनी मोदींच्या कामाचा पाढा वाचला आणि त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, हा पुरस्कार यापूर्वी अनेक लोकांना दिला गेला आहे. ज्या लोकांनी समाजामध्ये चांगलं काम केलं आहे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. शरद पवारांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करतो आणि टिळक स्मारक ट्रस्ट यांचे अभार मानतो, असं देखील शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी देशाचं सूत्र हाती घेतलं आणि 'सबका साथ आणि सबका विकास'चा नारा दिला. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचं नाव आदरानं घेतलं जातं. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. तेव्हा अभिमानाने छाती फुलते, असं म्हणत शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT