Latest

Om Birla meets Eknath Shinde | लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. ही त्यांची सदिच्छा भेट आहे. (Om Birla meets Eknath Shinde) याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करत दिली आहे.

''लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन त्यांना यथोचित सन्मानित केले. तसेच संसदेचे कामकाज आणि भारतीय लोकशाहीचे सौंदर्य यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.'' असे शिंदे यांनी म्हटले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT