Latest

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने रणनीती बदलली; ‘मेगा प्लान’ तयार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपकडून पहिल्यांदाच रणनीतीमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. या मेगा प्लान नुसार भाजपने पहिल्यांदा आपली रणनीती बदलली आहे. एबीपी हिंदीने या संदर्भात वृत्त दिले आहे. वृत्तात दिलेल्या माहितीनुसार भाजपने यावेळी पहिल्यांदाच पक्षाचे कामकाज सुलभ करण्यासाठी संपूर्ण देशाचे तीन विभाग केले आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशी तीन भाग तयार केले आहेत.

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यानंतर बुधवारी (28 जून) त्यांच्या निवासस्थानी भाजपची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत 2023 च्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा झाली आहे.

या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजप संघटन मंत्री बीएल संतोष उपस्थित होते. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, संघटनेतील फेरबदलाबाबत विचारमंथनानंतर पंतप्रधान मोदींसोबतची ही बैठक झाली आहे, अशा परिस्थितीत संघटनेत अनेक बदल होऊ शकतात.

Lok Sabha Election 2024 : या तारखांना होणार विभागवार बैठक

भाजपच्या प्रमुख नेत्यांची विभागाप्रमाणे 6, 7, 8 जुलै रोजी वेगवेगळ्या भागात बैठक होणार आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री यांच्यासह प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. 6 तारखेला पूर्व भाग, 7 तारखेला उत्तर आणि 8 तारखेला दक्षिणेची बैठक होणार आहे.

Lok Sabha Election 2024 : रणनीती ठरवण्यासाठी यांचा प्रमुख सहभाग

या बैठकीला प्रदेश प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याकडे प्रदेश कार्यकारिणी म्हणूनही पाहिले जात आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही भाजपची मोठी रणनीतिक कसरत मानली जात आहे.

Lok Sabha Election 2024 : कोठे होणार पुढील बैठक

पूर्वेसाठी 6 जुलैला गुवाहाटी येथे बैठक होणार आहे. या बैठकीत बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, असम, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, मेघालय, त्रिपुरा येथील पक्षातील नेते सहभागी होतील.

जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, गुजरात, दमण दीव-दादर नगर हवेली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा येथील भाजप नेते सहभागी होणार आहेत.

दक्षिण विभागाची बैठक 8 जुलै रोजी हैदराबाद येथे होणार आहे. ज्यामध्ये केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीपच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT