Latest

मुंबई सेंट्रल जवळ लोकल घसरली; पश्चिम रेल्वे विस्कळीत

निलेश पोतदार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून यार्डमध्ये जाणाऱ्या लोकलचे एक चाक घसरल्यामुळे संपूर्ण पश्चिम रेल्वे दुपारी 12 वाजल्यापासून विस्कळीत झाली आहे. मरीन लाईन्स स्टेशनपासून मुंबई सेंट्रलपर्यंत लोकलच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी लोकलमध्येच अडकून पडले आहेत.

काही प्रवाशांनी रेल्वे मार्गात उतरून जवळचे स्टेशन गाठले. या घटनेमुळे चर्चगेट विरार दरम्यान धावणाऱ्या सर्व लोकल 15 ते 20 मिनिट विलंबाने धावत असून, यामुळे लोकलचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT