Latest

Listeria virus : कॅडबरी उत्‍पादनात लिस्टेरिया व्‍हायरस! ‘एफडीए’कडे चौकशीची मागणी

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कॅडबरी उत्‍पादनांमध्‍ये लिस्‍टेरिया व्‍हायरस (Listeria virus) आढळून आला असून, महाराष्‍ट्रात विक्री होणार्‍या कॅडबरी उत्‍पादनांमध्‍ये याचा संसर्गाची चौकशी करावी, अशी मागणी ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशन (ALFDHF) ने महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) पत्र लिहून केली आहे. दरम्‍यान, याच महिन्‍याच्‍या प्रारंभ इंग्‍लंड आणि आयर्लंडमधील उत्‍पादने लिस्टेरियामुळे दूषित होऊ शकतात या भीतीने सहा कॅडबरी-ब्रँडेड मिष्टान्न कंपन्‍यांनी परत मागवले होते.

'लिस्टेरियाचा संसर्ग (Listeria virus) अन्नातून पसरणारा असल्याचे सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल'ने म्हटले आहे. त्यामुळे होणाऱ्या आजाराला 'लिस्टेरियोसिस' असे म्हटले जाते. लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियाने दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो. बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्याने गर्भवती महिला आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सर्वात जास्त धोका असतो. ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीने ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर उत्पादनांची एक्सपायरी तारीख तपासण्याचे आवाहनदेखील केले आहे.

क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स, ७५ ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबद्दल अलर्ट जारी केला आहे. क्रंची आणि फ्लेक डेझर्सवर अनुक्रमे १७ आणि १८ मेपर्यंत वापरण्याच्या तारखा आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर सुपरमार्केट चेन मूलर ही प्रॉडक्ट परत मागवत असल्याची माहितीही समोर आली आहे.

लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या शक्यतेमुळे म्युलरने विविध कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. सावधगिरीचे पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती 'एफएसए'ने निवेदनाद्वारे दिली.

काय आहेत लिस्टरिओसिसची लक्षणे ?

लिस्टरिओसिसची लक्षणे फ्लूसारखीच असतात. यामध्ये ताप, स्नायूंचे दुखणे किंवा वेदना, थंडी वाजून येणे, आजारी असणे किंवा अतिसार यांचा समावेश असल्याचे 'सीडीसी'ने म्हटले आहे. क्वचित प्रसंगी, संसर्ग अधिक गंभीरदेखील ठरू शकतो. यामुळे मेनिन्जायटिस (मेंदूज्वर)सारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलेला 'लिस्टिरियोसिस' झाला तर गर्भपात होण्याचा धोका असतो, असेही सांगण्यात आले आहे.

-हेही वाचा 

SCROLL FOR NEXT