पुणे :पुढारी वृत्तसेवा
भारत सरकारने स्वच्छ इंधनांच्या वाहनात वाढ करण्यासाठी PLI योजने अंतर्गत भारतातील २० कार उत्पादक कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात प्रामुख्याने टाटा, महिंद्रा आणि ह्यूंदाई या कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्या ऑटोमोबाइल ऑटो कॉम्पोनेंट क्षेत्रांसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इंसेन्टीव्ह करणाऱ्या कंपन्या आहेत. या योजनेसाठी एकूण ११५ कंपन्यांचे अर्ज आले होते. त्यातील २० कंपन्यांवर शिक्कामोर्तब केला गेला.
देशातील सर्वात मोठी चार चाकी वाहन निर्माती कंपनी मारुतीला मात्र मोठा झटका बसला आहे. मारुती कार या यादीतून हद्दपार केली गेली आहे. प्राप्त माहितीनुसार मारुती कंपनी PLI ने घालून दिलेले मापदंड पूर्ण करू शकलेली नाही.
निवड झालेल्या २० दोन चाकी वाहन उत्पादक कंपन्यांपैकी ओला इलेक्ट्रिक, टीव्हीएस, हीरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो आणि पियाजियो ह्या प्रमुख मोठ्या कंपन्या आहेत. या सर्व दोन चाकी कंपन्यांना सबसिडी मिळणार असून, त्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. याच सोबत पिनेकल इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक कॉमर्स वाहन सिटिंग आणि इंटीरियर कंपनी आहे. तिचा समावेश देखील सबसिडी घेणाऱ्या कंपन्यामध्ये झाला आहे
केंद्र सरकारने २३ सेप्टेंबर २०२१ साली PLI ही महत्वाकांक्षी योजना आणली होती. ह्या योजनेला २५,९३८ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला होता. या योजनेचा मोठा हेतु म्हणजे भारतात इलेक्ट्रोनिक आणि हायड्रोजन इंधनयुक्त गाड्यांच्या उत्पादनावर भर देणे हा आहे. वरील निवड झालेल्या २० कार उत्पादन कंपन्यांची 'चँपियन ओईएम इंसेन्टिव स्कीम' या सबसिडी साठी निवड झाली आहे.
https://youtu.be/noNF2Wn_uuA