Latest

Life Style Parenting : तुमची मुलं खूप हट्टी व चंचल आहेत का? मग ‘हा’ उपाय करून पाहा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Life Style Parenting पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी असते. मुलांचा स्वभाव जाणून घेऊन त्यांना योग्य ते वळण लावणे हे आव्‍हानात्‍मक काम  असते. त्यात आजच्या Life Style मध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेकदा वडिलधारी मंडळींचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे घरात लहान मुलांचं हट्टी होणं किंवा ती खूप चंचल होणे ही अगदी स्वाभाविक बाब बनली आहे. सामान्यपणे लहान वयात सगळीच मुलं खेळण्यासाठी, खाऊसाठी किंवा अन्य एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरतात. एका पातळीपर्यंत मुलांनी असा हट्ट धरणे ठीक असते. मात्र, मुलं गरजेपेक्षा अधिक हट्टी असतील तर मात्र तुम्हाला त्यावर काहीतरी उपाययोजना करावी लागणार.

Life Style Parenting  'हा' सोपा उपाय तुम्ही करू शकता

हट्ट करणे हा एक स्वभाव दोष आहे. प्रत्येक स्वभावाला आपल्या शरीरातील पंचतत्वापैकी कोणते ना कोणते तत्व कार्यरत असते. त्यामुळे या तत्वांना स्थिर करण्यासाठी मुद्रा रहस्य किंवा मुद्रा विज्ञानात विविध मुद्रांचे उपाय सांगितले आहेत. यामध्ये लहान मुलांच्या हट्टीपणाचा स्वभाव दूर करण्यासाठी देखील मुद्रा उपचार सांगण्यात आले आहे. हट्टी मुलांचा हा स्वभाव दोष दूर करण्यासाठी शून्य मुद्रा सांगितली आहे. Life Style Parenting

तुम्हाला तुमच्या लहान मुलांना गोड बोलून दिवसभरातून एकदा थोडावेळ ही मुद्रा लावून घ्यायची आहे. शुन्य मुद्रा लावणे खूपच सोपे आहे. तुमचे मधले बोट अंगठ्याच्या वरच्या भागात लावून त्यावरून अंगठ्याचा हलकेच दाब द्यायचा आहे. या मुद्रेमुळे आकाश तत्व संतुलित होते. Life Style जेवल्यानंतर मात्र ही मुद्रा लावू नये जेवणानंतर एक तासाने ही मुद्रा लावावी. दररोज 40 मिनिटे ही मुद्रा लावणे मुलांमधील हट्टीपणा कमी होतो. तसेच त्यांचा चंचल स्वभाव असेल उदाहरणार्थ अभ्यास करताना किंवा शाळेत शिक्षक शिकवताना लक्ष न लागणे या समस्या दूर होऊन त्यांच्यात एकाग्रता येण्यास सुरुवात होते. याशिवाय या मुद्रेने शरीर जड पडणे किंवा शरीर सुन्न पडणे यावरही ही मुद्रा परिणामकारक ठरते.

Life Style Parenting शून्य मूद्रा लावण्यासाठी खालील फोटो पाहा

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT