Latest

Libya: लिबियात मोठी दुर्घटना; प्रवासी जहाज बुडून ६१ जणांचा मृत्यू, लहान मुलांसह महिलाचाही समावेश

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: लिबियात मोठी दुर्घटना घडली आहे. लिबियातील किनाऱ्यावर जहाज बुडून ६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलांचाही देखील समावेश होता, असे लिबियातील इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या (IOM) हवाल्याने म्हटले आहे. असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. (Libya)

लिबियातील या प्रवासी जहाजात एकूण ८६ प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान लिबियातील ज्वारा शहरातून ते निघाले होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. असे या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांनी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन या संस्थेने सांगितले. भूमध्य समुद्र हा जगातील सर्वात धोकादायक स्थलांतर मार्गांपैकी एक आहे.

लिबिया आणि ट्युनिशिया हे स्थलांतरितांसाठी इटली मार्गे युरोप गाठण्यासाठी प्रमुख निर्गमन बिंदू आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ट्युनिशिया आणि लिबियामधून १५३००० हून अधिक स्थलांतरित या वर्षी इटलीमध्ये आले आहेत. लिबियातून समुद्रामार्गे स्थलातर करतानाच ही घटना घडल्याचे, रॉयटर्स ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT