Latest

Lemon : केसांच्या निरोगी आयुष्यासाठी लिंबू उत्तम

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेवणात लिंबाची (Lemon) एखादी फोड असेल तर, जेवणाची चव वाढते. कांदापोहे, उपमा, मासांहार अशा किती तरी पदार्थांची चव लिंबू शिवाय पूर्णच होत नाही. चवीने आंबट असणारे लिंबू औषधी गुणधर्मासाठीही प्रसिद्ध आहे. लिंबाचा उपयोग केसांच्या आरोग्यासाठीही फार चांगल्या प्रकारे होतो. कसा ते जाणून घ्या…

१) स्नान करण्यापूर्वी जर केसांना लिंबू चोळला तर केसांतील कोंडा आणि उवा कमी होतात.

२) तिळाचे तेल आणि लिंबूचा रस समभागात मिसळून केसांना लावावा, त्यानंतर केसांना दही चोळून स्नान करावे. याचाही केसांना लाभ होतो.

३) केस काळे, तजेलदार होण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठीही लिंबाचा उपयोग होतो. लिंबाचा रस, कापूरवडी, हळद, शिकेकाई पावडर डोक्याला चोळायची त्यानंतर रिठ्याचा वापर करून स्नान करायचे, यामुळे कोंडा हमखास कमी होतो.

४) वैद्यांच्या सल्ल्याने लिंबूचे तेल सेवन केल्याने केस काळे होण्यास मदत होते. भारतात सर्वसाधारणपणे लिंबूच्या २० च्यावर जाती आहेत.

आपण खाण्यामध्ये जो लिंबू वापरतो, कागदी लिंबू होय. हा लिंबू उत्तम मानला जातो. लिंबू हे सायट्रिक वर्गीय फळ आहे. व्हिटॅमिन C चे प्रमाण लिंबूत (Lemon) मोठ्या प्रमाणावर आहे.

हे वाचलंत का?

पहा व्हिडीओ : अपघातग्रस्तांची जीवन रक्षक १०८ अम्ब्युलन्स

SCROLL FOR NEXT