Latest

Lemon and chillies : लिंबू, हिरव्‍या मिरचीचे दर का वाढले?, ‘निसर्गा’पाठोपाठ इंधनदरवाढीचाही फटका

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच आता लिंबू आणि मिरचीच्‍या दरवाढीचा मोठा फटका देशातील विविध राज्‍यांमधील सर्वसामान्‍य नागरिकांना बसत आहे. ( Lemon and chillies) गुजरातमध्‍ये एका लिंबासाठी १८ ते २५ रुपये मोजावे लागत आहेत. तर राजस्‍थानमधील जोधपूरमध्‍ये तब्‍बल ४०० रुपये किलोदराने लिंबू विक्री होत आहे. दिल्‍लीत एका लिंबासाठी १० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच राजधानी दिल्‍लीत एक किलो हिरव्‍या मिरचीसाठी एक लिटर पेट्रोल एवढी किंमत मोजावी लागत आहे. जाणून घेवूया लिंबू आणि मिरचीचे दर का वाढलते?

हैदराबादमध्‍ये लिंबू ७०० रुपये किलो

हैदरबादमध्‍ये काही दिवसांपूर्वी लिंबू ७०० रुपये किलोने विक्री होत होती. आता यासाठी तब्‍बल साडेतीन हजार रुपये मोजावे आहे.  तसेच मिरचीच्‍या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बेंगळूर आणि दिल्‍लीत एक किलो मिरचीसाठी १२० रुपये मोजावे लागत आहेत.

Lemon and chillies : इंधन दरवाढीचा फटका भाजी-फळ विक्रेत्‍यांना

इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका हा भाजी व फळ विक्रेत्‍यांना बसला आहे. मालवाहतुकीमध्‍ये झालेली प्रचंड वाढ झाली आहे. त्‍यामुळे फळे आणि भाज्‍यांच्‍या किंमतीत वाढ झाली आहे. तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्‍ट्र आणि गुजरातमधील काही जिल्‍ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला हाेता. त्‍यामुळे यंदा लिंबू आवक कमी झाली आहे. गेल्‍या दीड महिन्‍यापासून दक्षिण भारतातूनही हिरव्‍या मिरचीची आवक कमी आहे. त्‍यामुळे हिरव्‍या मिरचीचे दर वाढले आहेत.

Lemon and chillies : रशिया-युक्रेन युद्धाचाही परिणाम

अन्‍न आणि कृषी संघटनाने (एफएओ) यासंदर्भात म्‍हटलं आहे की, अन्‍नाधान्‍याच्‍या किंमती मागील महिन्‍यात उच्‍चांकावर पोहचल्‍या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे धान्‍य आणि वनस्‍पती तेलाच्‍या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्‍या आहेत.
संयुक्‍त राष्‍ट्रच्‍या अन्‍न आणि कृषी संघटनेनेही जागतिक पातळीवर जीवनावश्‍यक वस्‍तुमध्‍ये फेब्रुवारी २०२२ पासून १२.६ टक्‍के वाढ झाल्‍याचे म्‍हटलं आहे. युक्रेनमधून जगभरात मोठ्या प्रमाणावर धान्‍य आणि खाद्‍य तेलाची निर्यात होते. युद्धामध्‍ये युक्रेनमधील अनेक शहरे बेचिराख झाली असून, संपूर्ण निर्यात प्रक्रिया ठप्‍प झाली आहे. यामुळे धान्‍य आणि खाद्‍यतेलाच्‍या किंमती गगनाला भिडल्‍या आहेत.

हेही वाचा :  

पाहा व्‍हिडीओ: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT