Latest

ICC Test Rankings : आयसीसी कसोटी क्रमवारीत रोहित, विराटची घसरण

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांची बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) अनुक्रमे आठव्या आणि 10व्या स्थानावर घसरण झाली आहे. रोहित अजूनही 754 गुणांसह फलंदाजीच्या यादीत एका स्थानाने घसरला असून तो आठव्या स्थानावर आहे. कोहलीचे ७४२ रेटिंग गुण असून तो १० व्या स्थानावर घसरला आहे. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरच्या (jason holder) जागी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

अश्विन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) गोलंदाजांच्या यादीत (ICC Test Rankings) अनुक्रमे दुसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. एकदिवसीय क्रमवारीत कोहलीने आपले दुसरे स्थान कायम राखले असून रोहितने पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी पोहचला आहे. गोलंदाजांमध्ये बुमराह सहाव्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वॉजाने (usman khawaja) कसोटी क्रमवारीत (ICC Test Rankings) प्रगती केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ख्वाजाने धडाकेबाज फलंदाजी केली, त्यामुळेच तो आपल्या कसोटी कारकिर्दीत प्रथमच 7 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ख्वाजाने 5 डावात 165.33 च्या सरासरीने 496 धावा केल्या.

ख्वॉजाने या मालिकेत 97, 160, नाबाद 44, 91 आणि 104 धावा केल्या. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लबुशेननेही (Marnus Labuschagne) आपले पहिले स्थान अबाधित ठेवले आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (joe root) आपले नंबर 2 स्थान गमावले आहेत. रूट आता चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा बाबर आझम (babar azam) पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT