Latest

Heart Attack : नाश्ता, रात्रीचे जेवण उशिरा केल्याने वाढतो हृदयविकार

मोहन कारंडे

नवी दिल्ली : हृदयविकाराचा झटका Heart Attack किंवा हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढताना दिसत आहे. व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव, यामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे. मात्र, याबरोबरच वेळीअवेळी जेवणे हेदेखील एक हृदयविकारासाठी कारणीभूत आहे.

अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात नाश्ता आणि रात्रीचे जेवण यात होणार्‍या चुकांमुळे हृदयविकाराचा Heart Attack धोका वाढतो, हे संशोधन 'नेचर कम्युनिकेशन जर्नल'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. यात एक लाखाहून अधिक लोकांच्या डाएट आणि आरोग्याबाबत सात वर्षांपर्यंत अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, नाश्ता उशिरा करण्याने हृदयासंबंधित आजार आणि स्ट्रोकचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो. तसेच रात्री 9 नंतर जेवल्याने स्ट्रोक किंवा ट्रान्झिएंट इस्केमिक अ‍ॅटॅकचा धोका 28 टक्के वाढतो. याशी संबंधित कारण असे मानले जाते की, आपल्या जेवणाचे पचन होण्यास विलंब होतो. त्यामुळे त्याचा परिणाम रक्तातील साखर आणि रक्तदाबावर होतो.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT