Latest

शाहरुख खानच्या ‘दुआ’ वरून विकृत मनोवृत्तीचा कळस (video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गानकोकिळा लता मंगेशकर आता या दुनियेत नाहीत. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात ८ जानेवारीला लता मंगेशकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यादरम्यान त्यांना न्यूमोनियाही झाला. अनेक दिवस आयसीयूमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यावरील उपचार निष्फळ ठरले.

लता मंगेशकर यांचे पार्थिव काल अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे ठेवले होते. यावेळी शाहरुख खान, आमिर खान, सचिन तेंडुलकर असे दिग्गज सेलिब्रिटींनी शिवाजी पार्कवर उपस्थिती दर्शवली. यावेळी अंत्यदर्शनासाठी शाहरुख खान गेला असता त्याचे व्हिडिओज व्हायरल झाले. हे व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले की, हे केवळ 'किंग'च करू शकतो.

खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेला होता. यावेळी तेथील व्हिडिओज व्हायरल झाले. यामध्ये तो मॅनेजर पूजा ददलानीसोबत दिसतो आहे. पार्थिवाला पुष्प अर्पण करण्यासाठी त्याच्या हातात पुष्पचक्रदेखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो हातात पुष्पचक्र घेऊन चेहऱ्यावर मास्क घातलेला दिसत आहे. त्याच्यासोबत सचिन तेंडुलकरही दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, खान लता मंगेशकर यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आधी दुआ करताना दिसतो. दुसऱ्या क्षणी हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे केवळ किंगच करू शकतो, असे म्हणत नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क य़ेथे अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, जावेद अख्तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुराधा पौडवाल, राहुल वैद्य, विद्या बालन, राज ठाकरे यांच्यासह अनेक सेलेब्स पोहोचले होते.

(videos- srkuniverse, Azharul Akash, ___.shahrukhkhan.__  वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT