Latest

Supreme Court : लाल किल्ल्यावर हल्ला करणा-या ‘लष्कर-ए-तैयबा’चा दहशतवादी अशफाकला ‘फाशीच’

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने मोहम्मद आरिफ उर्फ अशफाकची 2000 च्या लाल किल्ल्यावरील हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशाला आव्हान देणारी पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली.

Supreme Court : लाल किल्ल्यावर 22 डिसेंबर 2000 रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन जवानांसह तीन जण ठार झाले. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या प्रत्युत्तरादाखल लाल किल्ल्यावर घुसलेले दोन दहशतवादीही ठार झाले. तर मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक हा पकडला गेला होता. या प्रकरणात 31 ऑक्टोबर 2005 रोजी कनिष्ठ न्यायालयाने मोहम्मद आरिफला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT