पुढारी ऑनलाईन डेस्क : नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यावद यांची केद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग ( सीबीआय ) लवकरच चौकशी करणार आहे. या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यांना नोटीसही बजावली असल्याचे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. ( Land-for-jobs scam )
लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पाटणा येथील निवासस्थानी आज ( दि. ६ ) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) धडक दिली. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी सीबीआय पथकाने चौकशी सुरु केली आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि त्यांची मुलगी मिसा भारती संशयित आरोपी आहेत. सीबीआय पथक जेव्हा निवासस्थानी पोहचले तेव्हा राबडी देवी विधान परिषदेत जाण्याच्या तयारीत होत्या. या वेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह मंत्री, लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव आणि राबडी देवींचे बंधू आणि विधान परिषद आमदार सुनील कुमार सिंह उपस्थित आहेत.
लालू प्रसाद यादव सिंगापूरहून किडनी प्रत्यारोपण करून गेल्या महिन्यातच भारतात परतले आहेत. दरम्यान, सीबीआय पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आपल्याची माहिती मिळताच निवासस्थानाबाहेर आरजेडी समर्थकांची गर्दी जमू लागली आहे. आरजेडी समर्थक केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
लालूप्रसाद यादव यांना काही दिवसांपूर्वीच नोटी बजावली होती. सीबीआय लवकरच या प्रकरणी त्यांची चौकशी करेल, असे सीबीआयच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना 2004 ते 2009 दरम्यान जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा झाला होता. आरोपपत्रात राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुखांव्यतिरिक्त तत्कालीन रेल्वे महाव्यवस्थापकांच्या नावाचाही समावेश आहे.
हेही वाचा :