Latest

Lakhimpur violence : अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात 

backup backup

लखनऊ, पुढारी ऑनलाईन : माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लखीमपूर खेरी (Lakhimpur violence) या ठिकाणी जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. तसेच त्यांना ताब्यातही घेतलं आहे. अखिलेश यादव यांच्या बरोबर असणारे समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव आणि इतर कार्यकर्त्यांनाही पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

अखिलेश यादव यांच्या घराबाहेर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन (Lakhimpur violence) केले आहे. ठिय्या आंदोलन दरम्यान पोलिसांनी पार्टीच्या अध्यक्षांनाच ताब्यात घेत ईको गार्डन येथे पोहोचविले. पण, त्यापूर्वी अखिलेश यांच्या घराबाहेर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता.

यावेळी पोलिसांची गाडी पेटविण्‍यात आली. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना आज सकाळी लखीमपूर खेरी येथे जायचे होते. पण, त्या अगोदरच गौतमपल्ली येथे त्यांच्या घराबाहेर ट्रक उभा करून बॅरिकेड्स लावण्यात आले.

दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. तिथेच पोलिसांचा विरोध करत असंख्य कार्यकर्त्यांसोबत अखिलेश यांनी ठिय्या आंदोलन केले. लखीमपुरमध्ये झालेल्या हिंसेमुळे उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलेलं आहे.

समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आज (सोमवारी) सकाळी लखीमपुरला जाणार होते. हिंसाचारात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार होते. पण, पोलिसांनी आणि सुरक्षा दलाने त्यांना रोखले.

पहा व्हिडीओ : अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

SCROLL FOR NEXT