Latest

Met Gala 2024 : आलिया भट्टनंतर ‘लापता लेडीज’ची नितांशी गोयल ‘मेट गाला’च्या कार्पेटवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'लापता लेडीज' चित्रपटात 'फूल' हे पात्र साकारणारी नितांशी गोयल मेट गाला 2024 मध्ये स्पॉट झाली. (Met Gala 2024) बॉलिवूड स्टार आलिया भट्ट सब्यसाची मुखर्जीची साडी आणि शानदार मेकअपमध्ये मेट गाला 2024 मध्ये दिसली.  तर दुसरीकडे साध्या अंदाजात 'लापता लेडीज'ची नितांशी गोयल मेट गालाच्या कार्पेटवर उतरली. आमिर खान प्रोडक्शन्सच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर तिचा हा लूक शेअर करण्यात आलाय. नितांशी लाल रंगाची साडी नसून कार्पेटवर उतरली. (Met Gala 2024) नितांशी गोयलने 'लापता लेडीज' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. मेट गाला मध्ये ती सिंपल लाल साडीत दिसली. वरून मरून रंगाची शॉल ओढून आपल्या लापता लेडीजमधील भूमिकेत दिसली.

नितांशी गोयलबद्दल जाणून घ्या ५ मुद्दे

  • उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये नितांशीचा जन्म झाला
  • वयाच्या नवव्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते
  • २०१५ मध्ये तिने 'मिस पँटालून जूनियर फॅशन आयकॉन' चा किताब जिंकला
  • ती 'बीबा', 'ईस्ट एसेंस' सारख्या अनेक ब्रँड्सच्या जाहिरातीत झळकली होती
  • 'नागार्जुन: एक योद्धा', 'कर्मफल दाता शनि', 'इश्कबाज', 'डायन', 'पेशवा बाजीराव' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे

नितांशीचा साडी लूक पाहून काय म्हणाले फॅन्स?

नितांशी गोयलने सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर करत फॅन्सना याबाबत माहिती दिली की, ती मेट गाला 2024 चा भाग बनली. एका फॅनने कॉमेंट करत लिहिले की, 'आपल्या सदाबहार लग्नातील साडीत 'फूल' बहरत आहे'. दुसऱ्या युजरने लिहिलं 'या सीझनचे आवडते 'फूल'. आलियानंतर नितांशी गोयलची मेट गालामध्ये चर्चा होताना दिसतेय. अनेक हॉलिवूड स्टार अनेकविध फॅशन सादरीकरण करत असताना मात्र नितांशी देसी लूकमध्ये साडी नेसून, शाल ओढून कॅमेराबद्ध झाली. त्यामुळे तिचे फॅन्स 'सिंपल बट ब्युटीफुल' म्हणत कौतुक करताना दिसत आहेत.

नितांशी गोयलने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रिनशॉट शेअर केले

नितांशीला कसा मिळाला 'लापता लेडीज' चित्रपट?

नितांशीला हा चित्रपट कसा मिळाला, याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितले की, "माझ्याकडे ऑडिशनसाठी ३ सीन आले होते. तेव्हा मला माहिती नव्हतं की, हा चित्रपट आमिर सरांचा आहे. आणि दिग्दर्शन किरण मॅम यांचं आहे. मी केवळ ३ पाने वाचली . मला काहीही करून हा प्रोजेक्ट हवा होता. तीन सीन्सवर मी काम केलं. मला स्क्रिप्ट मिळताच विचार केला की, मला खूप तयारी करावी लागणार आहे. तिने अनेक चित्रपट, मालिका पाहून भोजपुरी अभिनेत्रींचा अभिनय पाहिला. अखेर माझे स्वप्न साकार झाले."

मेट गालामध्ये सादरीकरणानंतर नितांशीने  इन्स्टा पोस्ट शेअर केली

हेही वाचा-

SCROLL FOR NEXT