Latest

Sanjay Mandalik On Sangram Singh Kupekar : कुपेकरांनी माहिती घेऊन माझ्या उमेदवारीला विरोध करावा: खासदार मंडलिक

अविनाश सुतार

बिद्री: पुढारी वृत्तसेवा: मी शंभर टक्के लोकसभेच्या मैदानात आहे. आपले कार्यकर्ते आतापासून कामाला लागले असून आता माझी माघार नाही. आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला संघर्ष नवीन नाही, असे सुचक विधान करत भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी माझ्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजले. मात्र, कुपेकर यांनी माहिती घेवून बोलावे, असा पलटवार खासदार संजय मंडलिक यांनी आज (दि.१८) येथे केला. Sanjay Mandalik On Sangram Singh Kupekar

बिद्री (ता. कागल) येथे दिवंगत हिंदुराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आले असता खा. मंडलिक पत्रकारांशी बोलत होते.
खा. मंडलिक म्हणाले की, आपण विद्यमान खासदार असून महायुतीत शिंदे गटाच्या सर्वच्या सर्व १३ खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. महायुतीत जागेवरुन जरूर रस्सीखेच आहे. प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा आणि पक्ष विस्ताराचा हक्क आहे. कोल्हापुरातून विद्यमान खासदार म्हणून आपल्यालाच उमेदवारी मिळणार आहे. महायुतीचा फॉर्म्युल्यात बदल होवू शकत नाही. कुपेकर हे वडिलांपासून सहकारी आहेत. मागील अडीच वर्षांच्या काळात महायुतीत एकत्र असल्यापासून कुपेकर कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत. परंतु, त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरुन मी त्यांच्या शेताचा रस्ता केला आहे. Sanjay Mandalik On Sangram Singh Kupekar

आपल्याबाबत त्यांचे काही गैरसमज असल्यास समोरासमोर बसून त्यांचे गैरसमज दूर करणार आहे. माझ्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. विरोध करण्याचा संबंध येणार नाही. कोणी विरोध केला म्हणून माझी उमेदवारी नाही, असे समजू नये. एकदा उमेदवारी मिळाल्यावर सर्वजण एक होऊन आपल्या विजयासाठी झटतील. ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करणारी असून आपल्या विजयाने याला हातभार लागणार आहे.

यावेळी माजी जि. प. सदस्य भूषण पाटील, माजी पं. स. सदस्य नंदकुमार पाटील, हमिदवाडाचे संचालक आनंदराव फराकटे, माजी उपसरपंच भरत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT