Latest

नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी यादिवशी भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवी मालिका कुन्या राजाची गं तू रानी १८ जुलैपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय . डोंगरपाड्यासारख्या छोट्याशा गावात वाढलेल्या मात्र मोठी स्वप्न पहाणाऱ्या गुंजाची प्रेरणादायी गोष्ट या मालिकेतून पहायला मिळेल. गुंजा डोंगरपाड्याच्या निसर्गासारखी अगदी निरागस. स्वत: आनंदात राहून इतरांनाही भरभरुन आनंद देणाऱ्या गुंजाला शिकून खूप मोठं व्हायचं आहे आणि आपल्या आईला शहरात घेऊन जायचं आहे.

एकीकडे गुंजाची निरागस स्वप्न तर दुसरीकडे करिअरवर भरभरुन प्रेम करणारा कबीर. पेश्याने पत्रकार. एका मध्यमवर्गी घरात जन्मलेला, खडतर प्रवास करून मोठा झालेला आणि पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण करून खूप कमी वेळात महत्वाचे स्थान मिळवलेला धडाडीचा पत्रकार. त्याला समाजात बदल घडवायचा आहे. शोषितांचा लढा लढायचा आहे, आणि त्यासाठी तो कुठल्याही प्रकारचा खडतर मार्ग स्वीकारायला तयार आहे. अशाच एका बातमीच्या मागावर असताना कबीर आणि गुंजाची भेट होते. मात्र गावाच्या एका कठोर निर्णयामुळे दोघांच्याही आयुष्याला नवी कलाटणी मिळते. तिथूनच सुरुवात होते नव्या नाट्याची. अतिशय उत्कंठावर्धक अशी मालिकेची  गोष्ट असणार आहे.

दुर्वा आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अतकरी या मालिकेत कबीर ही व्यक्तिरेखा साकारत असून नवोदित अभिनेत्री शर्वरी जोग गुंजाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच वृंदा अहिरे, समिधा गुरु, वसुधा देशपांडे, संजय खापरे, पूर्णिमा डे, राजन भिसे, वनश्री पांडे अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT